आ. रोहित पवारांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट…. म्हणाले ….

0
40

आमदार रोहित पवार यांनी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची आज राजभवनात भेट घेऊन मराठी संस्कृतीनुसार टोपी-उपरणे घालून सन्मान केला आणि श्री विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती भेट दिली. यावेळी विविध विषयांवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. प्रचंड हुशार, दांडगा अनुभव आणि अनेक विषयांसंदर्भात खोलवर ज्ञान असलेलं हे व्यक्तिमत्व असल्याचं त्यांच्याशी चर्चा करताना जाणवलं. विशेषतः कृषी क्षेत्र, शेतकरी आत्महत्या या विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास आहे. त्यांच्या या ज्ञानाचा आणि अनुभवाचा राज्याच्या विकासासाठी निश्चितच खूप मोठा फायदा होईल, असं वाटतं. मागील काळातील वाईट अनुभव लक्षात घेता बैस साहेब यांच्यासारखे राज्यपाल राज्याला मिळणं ही राज्याच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. राज्य सरकारनेही त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा राज्याच्या हितासाठी निश्चित उपयोग करुन घ्यायला हवा.