महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीदरम्यान रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनीच फिल्डिंग लावली होती असा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के यांनी एकच खळबळ उडवून दिली असताना आ.रोहित पवार यांनी मात्र त्यांच्यावर पलटवार केला आहे. आरोप करणारी व्यक्ती फारशी कोणाला माहित नाही त्यांना महापौर करताना ते ज्या गटाचे आहेत त्यांच्याच प्रमुखांनी विरोध केला होता तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदत केली होती, अशी आठवण रोहित पवार यांनी यावेळी मस्के यांना करून दिली.
आज-काल नवीन नेत्यांचा ट्रेंड आलाय आणि पवारांवर टीका केली त्याशिवाय आपण मोठे होत नाही, त्यामुळे अशी टीका केली जाते असे सांगतानाच विरोधकांना पवार कुटुंबीय कधी समजलेच नाही आणि समजणार ही नाही अशा शब्दात पवार यांनी मस्के यांचा समाचार घेतला.