राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर आमदार रोहीत पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहुन खोचक टीका केली आहे. यासाठी त्यांनी दादा कोंडके यांच्या सिनेमांच्या नावाचा संदर्भ दिला आहे. आ. पवार यांनी म्हटले आहे की,
आजच्या राजकीय परिस्थितीबाबत दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या भाषेत बोलायचं झालं तर…
‘मला घेऊन चला’ म्हणून ‘पळवा पळवी’ करत ‘तुमचं आमचं जमलं’ म्हणत ‘सोंगाड्यां’चं राज्य आलं खरं!
पण सध्या ‘खोल दे मेरी जुबान’ असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या सामान्य माणसावर आलीय…
अरे… राज्याच्या भल्यासाठी थोडी तरी ‘आगे की सोच’ असू द्या.. नाहीतर ज्यांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिलं तेच उद्या म्हणतील ‘वाजवू का?’