सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेवर वर्षाला १५० कोटींचा खर्च…आ.रोहीत पवार यांनी मांडला लेखाजोखा

0
27

सत्ताधारी पक्षाच्या 60 आमदारांचा दरमहा खर्च हा 12 कोटी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका मांडलीय. राज्यातील 60 आमदारांच्या सुरक्षेवर वर्षाला 144 कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. तसेच राज्यातील 12 खासदारांचा सुरक्षेवर दर महिन्याला अडीच कोटी रुपये खर्च होत आहेत. तर वर्षाला दीडशे कोटी रुपये खर्च होत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय.

विधी मंडळाच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी आमदारांच्या खर्चाचा आढावाच ट्वीटद्वारे मांडलाय.