आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात, सुखरूप बचावले, कोणतीही इजा नाही!
नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला आज पहाटेच्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वर अपघात. सुदैवाने आमदार संग्राम जगताप यांना कुठलीही इजा झाली नसून ते मुंबईला सुखरूप पोहोचले आहेत.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मुंबईच्या दिशेने जात असताना सकाळी साडेपाचच्या सुमारास आमदार जगताप यांची गाडी रायसनीजवळ पोहचली. यावेळी एसटीने जगताप यांच्या BMW गाडीला जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यात जगताप यांच्या गाडीचा अक्षरशः चकनाचूर झाला आहे. सुदैवाने आमदार जगताप सुखरुप आहेत.






