आ.संग्राम जगताप यांचा रिक्षा प्रवास….व्हायरल व्हिडिओ

0
1679

आ.संग्राम जगताप यांचा रिक्षा प्रवास….व्हायरल व्हिडिओ
नगर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नगरमध्ये उत्साहात साजरी झाली. मार्केटयार्ड येथील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच रिघ लागली होती. आ.संग्राम जगताप हे सुध्दा अभिवादनासाठी आले होते. कार्यक्रमानंतर गर्दीतून वाट काढत असताना आ.जगताप यांनी रिक्षा थांबवली. या रिक्षातूनच ते पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. आ.जगताप यांचा हा रिक्षा प्रवास अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केला. त्यांच्यासमवेत उपमहापौर गणेश भोसले, मर्चंटस्‌ बँकेचे संचालक संजय चोपडा हे सुध्दा रिक्षातून रवाना झाले.

Video by – Mukund Bhat