नगर प्रतिनिधी – शहरात घरपट्टी व पणीपट्टी तसेच इतर करांची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. या करावरती शास्तीचा दंड लावण्याने नागरिकांना कर भरणे शक्य होत नाहीये, नुकतेच कोवीडच्या संकटातून सर्व नागरिक आताच कुठे सावरले आहेत नागरीक कर भरण्यासाठी तयार आहेत परंतु शास्तीचा दंड लागल्यामुळे नागरिकांना कर भरणे शक्य होत नाहीये तरी नागरिकांना शंभर टक्के शास्ती माफी करावी अशी मागणी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात पुढे म्हणाले, मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे 100% शास्ती माफी केल्याने नागरीक मोठ्या प्रमाणात कर भरतील व या करारुपी शहर विकासाचे प्रश्न मार्गी लागली जातील असे म्हटले आहे.