कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्ह्यातील जैनाचार्य कामकुमारनंदीजी यांच्या हत्येच्या घटनेवर कर्नाटक सरकारने दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी
आमदार संग्राम जगताप यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून मागणी
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात 5 जुलै, 2023 रोजी जैनाचार्य कामकुमारनंदजी यांना निरंकार ऊपवास असताना अपहरण करून इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले व त्यानंतर शरीराचे तुकडे तुकडे करून हत्या करून शरीराचे भाग बोअरवलेमध्ये टाकण्यात आले सदर घटना अत्यंत क्रूर आणि निंदनीय आहे. तसेच जैनसाधु संपप्रती जैन धर्मियांच्या अस्मिता संवेदनशील भावना असतात आणि वारंवार घडणाऱ्या अशा घटना जैन समाजासाठी तसेच सर्व मानवजातीला फारच वेदनादायी मनाला हेलावून टाकणाऱ्या असतात. याचबरोबर मागील काही दिवसांपासून वारंवार प्राचीन जैन तिथावर होणारे अतिक्रमण तसेच जैन साधु संताचे विहारा दरम्यान घडवून आणलेले अपघात या सर्व बाबी जैन समाजाच्या आस्थेवर घाला घालणाऱ्या आहेत. सदर हत्येची सी.बी.आय सखोल चौकशी करण्यात यावी तसेच गुन्हेगारांवर फास्ट ट्रैक न्यायालयात खटला चालवून लवकरात लवकर न्याय द्यावा तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची योग्य खबरदारी घेण्यात यावी. तसंच प्राचीन जैन तिर्थावर होणाऱ्या अतिक्रमणांवर योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तरी दिनांक 5 जुलै 2023 राजा कर्नाटक मधील बळगांव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात जैनाचार्य कामकुमारनंदोजी यांच्या हत्येच्या घटनेवर कर्नाटक सरकारने या घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली.
यावेळी आमदार सुनिल टिंगरे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार नितीन पवार, आमदार आशुतोष काळे आदी उपस्थित होते.