धनंजयची सगळी लफडी टीव्हीवर बाहेर आली आहेत, शिंदे गटाचा राष्ट्रवादीवर पलटवार

0
1327

मुंबई – महाराष्ट्राशी गद्दारी, सत्तेत आली शिंदेची स्वारी… आले रे आले गद्दार आले.. अशा घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडल्याचे आज सकाळीच पाहायला मिळाले. या घोषणेत धनंजय मुंडे हे अग्रस्थानी असल्याचं दिसून आलं. सरकारची तुलना गद्दार अशी केल्याने आता शिंदे गटातील आमदारही चांगलेच संतापले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी आता राष्ट्रवादीवर पलटवार करताना अजित पवार यांच्या शपथविधीची आठवण करुन दिली. 

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादीवर पलटवार केला असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं आहे. 

विधानसभेच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकार विरोधात नारेबाजी केली. पण, राष्ट्रवादीच्या आमदारांना आम्हाला गद्दार म्हणायचा अधिकार नाही. यापूर्वी अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दरी करुनच शपथ घेतली होती, त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही?, असा सवाल शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. तसेच, सत्ता गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असून याशिवाय त्यांच्याकडे काहीच उरले नाही, असा टोलाही गायकवाड यांनी लगावला.

धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार करताना गायकवाड म्हणाले, धनंजयची सगळी महाराष्ट्रातील लफडी टीव्हीवर बाहेर आली आहेत. जो लोकप्रतिनिधी आहे आणि याला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का?. आम्ही गद्दार नसून खुद्दार आहेत, आमाच्यावर बोलण्याचा अधिकार राष्ट्रवादीवाल्यांना नाही, अशा शब्दात धनंजय मुंडेंवर गायकवाड यांनी सडेतोड पलटवार केला. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्हाला पैसे घेण्याची गरज नाही. राज्यात महिन्याभरापूर्वी यांची सत्ता असताना शेतकऱ्यांना मदत केली नाही. मात्र, आमच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत दिलीय, असेही गायकवाड यांनी सांगितले.