अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला आलेल्या महिला आमदाराला मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट दालनात बोलावून केले कौतुक….

0
20

नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे त्यांच्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन नागपूर येथे विधानभवनात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या दालनात बोलवून त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. तसेच त्यांच्या या कृतीचे जाहीर कौतुक केले.

विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मत यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.