पंकजा मुंडे यांचं शिवसेना पक्षात स्वागत आहे…

0
22

शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे गुरुवारी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका दौऱ्यावर होते. त्यांनी येथे विविध ठिकाणी शिवसेनेच्या शाखांचं उद्घाटन केलं. दरम्यान, त्यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत प्रतिक्रिया दिली. पत्रकारांशी बोलताना सुनील शिंदे म्हणाले, “पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे त्यांचं मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. पण पंकजा मुंडे भाजपाच्या फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होतोय, हे आम्हाला दिसतंय. पण त्या आणि त्यांच्या पक्षातील हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही. पण त्यांच्या कर्तुत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे यांचं शिवसेना पक्षात स्वागत आहे,” अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.