सुप्रिया सुळे यांच्याच उपस्थित भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं असल्याचा गौप्यस्फोट आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
सत्तेत जायचं हे शरद पवार यांना विचारावं असं आम्हाला वाटत नव्हतं, असं मोठं विधानही सुनील शेळके यांनी केलं आहे. सुप्रिया सुळे यांच्याच उपस्थित भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं. सत्तेत जायचं हे शरद पवार यांना विचारावं असं आम्हाला वाटत नव्हतं. अजित पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत सुप्रिया सुळेदेखील होत्या. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे, छगन भुजबळ हे नेतेही होते. ह्या नेत्यांनी सत्तेत जायचा निर्णय घेतला, असा मोठा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला आहे.
अजित पवार यांनी आम्हाला बोलवून घेतलं. त्यांनी सत्तेत जाण्याबाबत स्पष्ट सांगितलं होतं. भाजपसोबत जाण्याविषयी त्यांनी आमच्याशी चर्चा केली. राज्याच्या विकासासाठी, लोकहिताची कामं करण्यासाठी आपण सत्तेत असणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्तेत राहायचं म्हणून आम्ही सह्या दिल्या, असं सुनील शेळके यांनी सांगितलं.






