बेभान सुटलेल्या बैलाला किती मोकाट सोडणार?… अजितदादांच्या आमदाराची सुरेश धस यांच्यावर टिका

0
64

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी योग्य कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर जाहीर सभा पार पडली. या सभेत आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख करत त्यांनी धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री न देण्याची मागणी केली. या मागणीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून पलटवार करण्यात आला आहे. विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच बेभान सुटलेल्या बैलाला किती मोकाट सोडणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करत सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. “श्री. देवेंद्र फडणवीसजी आपल्या पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?”https://x.com/amolmitkari22/status/1875754415300460556