अमरावतीमध्येही भाजपला धक्का; मविआचे धीरज लिंगाडे विजयी

0
30

अमरावतीमध्ये महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे धिरज लिंगाडे हे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. धीरज लिंगाडे हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. अखेर त्यांनी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे या जागेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष होतं, त्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे