नाशिक पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे प्रेरणादायी व्हिडिओंच्या माध्यमातून युवा वर्गाला मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात. नवीन गाडी खरेदी बाबतचा किस्सा सांगणारा सत्यजीत तांबे यांचा एक व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.गाडीच्या बाबतीतही एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की नवीन गाडी विकत घ्यावी, हे जे लोकांच्या डोक्यात खूळ घुसलेलं आहे, की आपल्याला नवीनच गाडी पाहिजे, याचे उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो, की राज्याचे मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा. अत्यंत मोठा माणूस, म्हणजे आपल्याला माहित आहे की, लोढा हा भारतातील एक टॉपचा रिअल इस्टेट ब्रँड आहे.” असं सत्यजीत तांबे बोलताना व्हिडिओमध्ये दिसतं. एकदा काय झालं, माझ्याकडे एक गाडी होती, ती गाडी त्यावेळी ८-९ वर्ष जुनी झाली होती, ती गाडी विकावी आणि नवीन कार बुक करावी, असा माझा निर्णय झाला होता. मी नवीन गाडी त्या दिवशी बुक करणारच होतो. मी मुंबईत एके ठिकाणी उभा होतो. योगायोगाने त्या दिवशी, माझी जुनी गाडी ज्या ब्रँडची होती, त्याच ब्रँडच्या गाडीतून मंगलप्रभात लोढा आले.” असं तांबे सांगत आहेत. मग मी विचार केला, ही व्यक्ती जर नऊ वर्ष जुनी गाडी वापरत आहे, तर आपण तर कोणीच नाही, आपण कशाला नवीन गाडी बुक करायची, असं म्हणून मी माझी नवीन गाडी घ्यायचं टाळलं.