जालन्यात मराठा मोर्चावरील लाठीचार्ज, राज ठाकरे म्हणाले…

0
31

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवर प्रतिक्रिया दिली आहे. “जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी याचा निषेध नोंदवतो,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच इथं सरकार चुकलं हे निश्चित, असं म्हणत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला.

राज ठाकरे म्हणाले, “या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती.”