मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेल येथील मेळाव्यात भारतीय जनता पक्षाचे वाभाडे काढले. टोलच्या मुद्द्यावरून मध्यंतरी भाजपने मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना लक्ष्य केले होते. राज ठाकरेंनी याचा खरपूस समाचार घेतला. भाजपने आम्हाला शिकवण्यापेक्षा इतर पक्षाचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष उभा करायला शिकावं अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
आम्हाला टोल फोडू नका, उभा करा म्हणणाऱ्या भाजपाने इतरांचे पक्ष फोडण्यापेक्षा आधी स्वतःचा पक्ष उभा करायला शिकावं ! pic.twitter.com/TIhffBQssH
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 16, 2023