भुजबळ, राणे, शिंदे बंड करून सत्तेत गेले, मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो…राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर…

0
28

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्ताने अनेक जण बाळासाहेबांच्या आठवणींनी उजाळा देत आहेत. मनसेने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यात राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरे यांची झालेली भेट व त्यावेळी झालेला संवाद सांगितला आहे. मी सत्तेसाठी बाहेर पडलो नाही तर बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो असे या व्हिडिओज राज ठाकरे सांगताना दिसतात.