विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरे म्हणाले, अश्या निवडणूका न लढवलेल्याच बऱ्या

1
75

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यातून बोलतांना राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालावर देखील संशय व्यक्त केला. तसेच मनसेच्या पदाधिकार्‍यांनी देखील कानपिचक्या दिल्या.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की,”मागील दोन महिन्यांत बरेच लोक मला भेटायला आले. विधानसभेच्या निकालानंतर राज्यात सन्नाटा निर्माण झाला होता. लोकांनाही या निकालाचे आश्चर्य वाटले, मिरवणुका निघाल्या नाहीत. लोकांमध्ये संभ्रम होता, असं कसं झाले. आपल्याला मतदान झालं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही. लोकांनी केलेले मतदान कुठेतरी गायब झाले, असं होणार असेल तर निवडणुका न लढलेलं बरं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या गोष्टीचे आकलन सुरू आहे”, असे त्यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत जे शरद पवार १० पैकी ८ खासदार निवडून आणतात, त्यांचे विधानसभा निवडणुकीत फक्त १० आमदार निवडून येतात, यावर विश्वासच बसत नाही. चार महिन्यात लोकांच्या विचारात इतका बदल कसा झाला असेल, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटलांचे १४०० लोकांचं गाव आहे, पण त्या गावातानू त्यांना एकही मत मिळाले नाही.राजू पाटलांना स्वत:च्या गावातून एकही मत कसं मिळू शकत नाही”, असे म्हणत राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित केली.

लोकसभेला काँग्रेसचे 13 खासदार जिंकले त्या खासदारांच्या खाली ४ ते ५ आमदार असतात त्यांचे १५ आमदार आले ? शरद पवार यांचे ८ खासदार आहेत त्यांचे इतके कमी आमदार ? चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात? काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे, असे राज ठाकरे म्हणाले. या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलय फक्त ते आपल्यापर्यंत आलेल नाही हे लक्षात घ्या. अश्या प्रकारच्या जर निवडणूका होत असतील तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्वेग व्यक्त केला.

1 COMMENT

  1. […] .कृषी विभागातील खरेदी संर्दभात पुरावे असल्याशिवाय कारवाई होणार नाही. अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे या दोघांनी आपली बाजू मांडली आहे. त्याची शहानिशा केली जाईल. त्यानंतर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांना पैसे दिले आहेत, ते परत घेणार नाही. पुढील कालावधीसाठी पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यासाठी सर्व्हे सुरू आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकर… […]

Comments are closed.