कुछ तो गडबड हैं !…शिर्डीत शिबिर समारोपाला अजित पवार गैरहजर

0
1537

आजारी असतानाही ज्येष्ठ नेते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबीरात यांनी उपस्थिती लावली. यापेक्षाही जास्त लक्ष वेधून घेतलं ते अजित पवार यांच्या अनुपस्थितीने. हाच मुद्दा पकडत मनसे नेते गजानन काळे यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलंय. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा वारंवार घडत असतात. आजचं हे चित्र अधिक बोलकं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड आहे, असं सांगणारं असल्याचं ट्विट गजानन काळे यांनी केलंय.

गजानन काळे यांनी ट्विट केलंय. ते म्हणाले, ‘आदरणीय पवार साहेब तब्येत ठीक नसतांना राष्ट्रवादीच्या शिबिरात येतात व अजितदादा बरोबर त्याच वेळी वैयक्तिक कारण सांगून अनुपस्थित राहतात. ही बाब काही पचनी पडत नाही. तसेही दादा विरोधी पक्षनेते म्हणून शांत आहेत काही दिवसांपासून…. गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून रहा रे. कूछ तो गडबड हैं.