मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल, महायुतीत सहभागी होण्याच्या हालचालींना वेग? Video

0
20

देशात लोकसभेच्या निवडणुका लागल्या असून अनेक पक्ष जागावाटप जाहीर करत आहेत. यंदाची निवडणूक ही इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी रंगणार आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपासाठी चुरस आहे. तर अनेक मित्रपक्षही जागेसाठी आग्रही असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही लढवणार आहेत. त्यामुळे मनसे यंदा एकट्याने ही निवडणूक लढतेय की कोणाच्या पाठिंब्याने हे पाहावं लागणार आहे. परंतु, या सर्व गदारोळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत.