मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मनसेचे प्रत्युत्तर, तिथे दाढीचा वस्तरा नाही अतिरेकीच सापडतात!

0
1046

mns Vs ncp…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मदरशांची तपासणी करण्याची मागणी गुढीपाडव्या मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्य्रामध्ये दाढीचा वस्तराही सापडणार नाही असे वक्तव्य केले होते. आव्हाड यांच्या या वक्तव्याला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे नगर जिल्ह्याचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्टिट करीत आव्हाड यांना टोला लगावला आहे. मुंब्य्रात दाढीचा वस्तरा सापडणार नाही कारण तिथे अतिरेकीच सापडतात असे व्टिट वर्मा यांनी केले आहे.