प्रेयसीच्या मोबाइलचे बिल भरून वैतागलेल्या प्रियकराचा व्हिडीओ …

0
1125

नुकताच प्रेम प्रकरणासंबंधित असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; जो पाहून तुम्हाला हसू आवरणे अवघड होईल.प्रेमात संवाद कधीच संपत नाही. पण काही वेळा एकमेकांपासून दूर असल्यामुळे प्रेमी युगुल मोबाईलवर तासन् तास बोलत आपल्या प्रेमाच्या गोष्टी करत असतात. अशाने मोबाइलचे आलेले बिल पाहून डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. अलीकडेच सोशल मीडियावर प्रेयसीच्या मोबाइलचे बिल भरून वैतागलेल्या अशाच एका प्रियकराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात त्याने गाण्याच्या माध्यमातून आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. व्हिडीओमध्ये एक पत्र दिसत आहे; ज्यामध्ये त्या व्यक्तीने ‘दिलवाले’ या हिंदी चित्रपटातील ‘जीता था जिसके लिए’ गाण्याच्या ट्युनवर एक हटके गाणे लिहून, ते तो गातोय. हा व्हिडीओ @simplyeedits या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.