आईने भर रस्त्यात मुलाला चोपले, कारण ऐकून तुम्ही म्हणाल आई असावी तर अशी…व्हिडिओ

0
25

सध्या जो काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तो लोकांना अधिक आवडला आहे. आपल्या मुलाला सुरक्षेच्या कारणावरुन आई किती त्रास देत आहे, हे पाहायला मिळत आहे. सध्या लोकांना रस्त्यावरून चालणं सुध्दा अधिक अवघड झालं आहे. कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे रस्त्याने जाताना नेहमी काळजी घेतली जाते. हेल्मेट हे सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या डोक्यात असायला हवं. कारण ते नसेल तर तुम्हाला कधीही गंभीर इचा होऊ शकते. सध्याचा जो एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आईला मुलगा ज्यावेळी रस्त्यात बिना हेल्मेट पाहायला मिळतो, त्यावेळी आईने काय केलंय हे तुम्ही व्हिडीओत पाहा.

तिथं असलेल्या पोलिसांना देखील हा प्रकार लक्षात आलेला नाही. त्यावेळी आई आपल्या पोटच्या मुलाला कशा पद्धतीने ओरडत आहे, हे पाहून पोलिस कर्मचाऱ्यांना हा प्रकार समजतो. व्हिडीओमध्ये आई मुलावर प्रचंड रागावली आहे. त्याचवेळी आईने मुलाला मारहाण देखील केली आहे. त्यावेळी मुलगा इथंच तर जात होतो,अशी आईची समजूत काढत आहे. त्यावेळी आई सांगते की, अपघात काय सांगून होतो काय ? हा व्हिडीओ सोशल मीडियावर @HasnaZarooriHai अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.