Monsoon आला वेशीवर… हवामान खात्याकडून महत्त्वपूर्ण अंदाज जाहीर

0
772

महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून असानी चक्रीवादळामुळे ढगाळ वातावरण होते तर काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दरम्यान आज हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या 3 आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे. 13 ते 19 मे दरम्यान मान्सूनला सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे.

मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. दरम्यान यंदा चार दिवस आधीच पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर केरळमध्ये 20 ते 26 मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अंदमानानवर आगामी पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर अरबी समुद्रावर दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर भारतात पुढील आठवड्यात मान्सून दाखल होईल.