चर्चा तर होणारच… भाषणासाठी नाव असूनही खा. अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या अधिवेशनात गैरहजर

0
718

शिर्डी येथे राष्ट्रवादीचे मंथ़न शिबिर पार पडले. दोन दिवसीय शिबिराला राज्यभरातील राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे अनुपस्थित राहिल्याने सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व अमोल कोल्हे करतात. मात्र कोल्हे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात देखील दिसत नसल्याचं बोललं जातं. आता ते राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या अधिवेशनाला देखील उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नुकताच त्यांचा गरुड झेप नावाचा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. मात्र काही दिवसांपासून ते मतदारसंघाच्या कार्यक्रमांना देखील उपस्थिती लावत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच शिर्डीत राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला न आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.