हंगा गाव ते दिल्लीतील संसद…. संसदेत पहिलं पाऊल ठेवताना खा.लंके यांनी व्यक्त केल्या भावना…

0
12

नवनिर्वाचित १८ व्या लोकसभेचे पहिले सत्र आजपासून सुरु होत आहे. या पहिल्या सत्राला उपस्थित राहत असताना मनात कृतज्ञतेची भावना आहे. आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून मला निवडून लोकसभेत पाठविले. एका निवृत्त शिक्षकाचा मी मुलगा, किराणा दुकान, चहाची टपरी, कंपनीत फिटरची नोकरी अशी कामे करताना समाजकारणाशी जोडला गेलो. माझ्या हंगे या गावातून सुरु झालेला हा प्रवास आज दिल्लीत येऊन ठेपला.

यामागे केवळ सर्वसामान्य माणसाचा माझ्यावर असणारा विश्वास, त्यांचे प्रेम आणि माया आहे याची मला जाणीव आहे.माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण केवळ लोकसेवेसाठी आहे. माझ्यावर माझ्या माणसांनी जो विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत असेन हा शब्द यानिमित्ताने देतो.आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब,खासदार सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले.

हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठेवा आहे. याबद्दल या सर्वांचे मनापासून आभार. माझ्या विजयासाठी रात्रीचा दिवस करणारे माझे सहकारी, कार्यकर्ते , महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी आदी सर्वांचे माझ्यावर प्रेमाचं ॠण आहे. त्यातून उतराई होण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे.
धन्यवाद.