खासदार लोखंडेंच्या प्रतिमेला काळे फासून शिवसैनिकांनी वाटले पेढे

0
633

खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने संगमनेर येथील शिवसैनिकांनी खासदार लोखंडे यांचा तीव्र निषेध केला. लोखंडे यांच्यावर गद्दारीचा आरोप करत आता चांगल्या शिवसैनिकाला भविष्यात खासदारकीची उमेदवारी मिळेल या भावनेतून शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला.

संगमनेर शहर शिवसेनेच्या संपर्क कार्यालयासमोर हा निषेध नोंदविण्यात आला. शिवसेनेत असताना खासदार लोखंडेंनी कोणतेही काम केले नाही कोणत्याही शिवसैनिकांना मदत केली नाही व मतदार संघात कधी फिरकलेच नाही. मतदार संघातल्या लोकांच्या गाठीभेटी कधी घेतल्या नाही लोकांच्या सुखदुःखात कधीच गेले नाही आणि ते शिंदे गटात सामील झाले. या गोष्टीचा निषेध व्यक्त केला व ते निघून गेल्यामुळे शिवसेनेला पोकळी नाही तर त्यांच्या जागी चांगला शिवसैनिक भविष्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडून येईल याचा आनंद शिवसैनिकांनी व्यक्त केला.

FB IMG 1658377645428