मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच शिंदे गटाने आक्रमक होत मुंबई महानगरपालिकेच्या पक्ष कार्यालयावर ताबा घेतल्यामुळे हे राजकारण तापले आहे. त्यामुळे आता शिवसेना भवनाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
शिवसेना भवनबाबत माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी सांगितले की, शिंदे गटाचा बाप जरी आला तरी शिवसेना भवनमध्ये घुसू शकत नाही असा थेट इशारा त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.
शिवसेना भवनच्या मुद्यावरूनच खासदार संजय राऊत यांना छेडल्यानंतर त्यांनी थेट शिंदे गटाचा बाप काढत म्हणाले की, शिंदे गटाचा बाप जरी आला तरी शिवसेना भवनमध्ये घुसू शकत नाही. त्याला खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर देत त्यांची अक्कल काढली आहे.






