राम शिंदे यांच्या ‘त्या’ वक्तव्याला सुजय विखे यांनी दिले उत्तर
नगर : भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे यांनी अहमदनगर मधून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उत्तर दिले. “आम्ही २०२४ ला नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते आम्ही करणार… मी कुठल्या पदावर असायला पाहिजे, अशी माझी काही अपेक्षा नाही,” असे खासदार विखे म्हणाले.