आपलं कर्म याच जन्मी फेडावे लागतं…खा. उदयनराजे भोसले यांची पवारांवर टीका

0
802

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या घरावर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या हिंसक आंदोलनाचं समर्थन केलं आहे. बरोबर झालंच पाहिजे, करायलाच पाहिजे, अजून दगडं मारायला पाहिजे. फार छोटा विचार झाला, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

कर्म असतं ना कर्म… जे आपण जन्मभर करतो… प्रत्येकजण मला लागू होतं, तुम्हाला आणि सगळ्यांना लागू होतं… यातून कोण वाचत नाही. जे आपण या जन्मी करतो, ते ह्याच जन्मी आपल्याला कुठल्याना कुठल्या पद्धतीने फेडावं लागतं. अजून काय बोलणार, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर जहरी टीका केली.