मनोज जरांगे पाटील मुंबईत आल्यावर सरकार कारवाई करणार? मंत्री केसरकर यांनी मांडली भूमिका…

0
19

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लाखो बांधवांसह मुंबईकडे निघाले आहे. पण त्यांच्या शासनाकडून ज्या ज्या अपेक्षा होत्या त्या संदर्भात शासन सकारात्मक आहे. कारवाई करायची वेळ येणार नाही. त्यांच्या मागण्या पूर्ण होत आहेत, त्यामुळे कारवाई करायची वेळ येणार नाही. प्रत्येक सरकारची जबाबदारी असते कायदा आणि सुव्यवस्था टिकवणे म्हणून कोर्टात तशी भूमिका घ्यावी लागते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबईत परवानगी देऊ नये म्हणून गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने कायदा आणि सुवव्यस्था पाळण्याचे आदेश सरकारला दिले आहे. याच मुद्यावर दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली.

‘मराठा समाज जागरुक समाज आहे. विधेयक आपल्याला आणावं लागेल. मुंबईच जीवन व्यस्तं असतं. मुंबई घड्याळ प्रमाणे चालणार आहे. मोठ्या प्रमाणात लोक आली तर सर्व गोष्टीवर परिणाम होईल. ते स्वतः एक संवेदनशील नेते आहेत. महाधिवक्त्यांनी कोर्टात हमी दिलीय की राज्य सरकारतर्फे जर जरांगे यांचा मोर्चा मुंबईत आला तर कारवाई करु. कारण त्यांनी परवानगी घेतली नाही, असं केसरकरांनी स्पष्ट केलं.