महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील #मुंबई विभागाचे सचिव अल्ताफ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश करत #युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला.
अल्ताफ खान यांनी अजमेर शरीफ दर्ग्यावर चढवण्यासाठी आणलेली चादर याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे समोर सादर केली. ही चादर लवकरच अजमेर शरीफ दर्ग्यावर चढवून महाराष्ट्राला सुख शांती आणि स्थैर्य लाभावे यासाठी प्रार्थना केली जाणार आहे. यासोबतच मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनीही खास जेवणाचा डबा भेट म्हणून देत युती सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला. यासोबतच वर्सोवा येथील कोळी बांधवांनी देखील युती सरकारला पाठींबा देत त्यांच्या समस्या मांडल्या. त्यांच्या सर्व मागण्या नक्की पुर्ण करू असे यावेळी आवर्जून सांगितले. याप्रसंगी कोळी बांधवांनी पारंपारिक कोळी नृत्य सादर करून सगळ्यांची मने जिंकली.
याप्रसंगी खासदार हेमंत पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार सदा सरवणकर, आमदार संतोष बांगर, गोपाळ लांडगे, कॅ.अभिजित अडसूळ यांच्यासह वैष्णवी घाग, संदीप बाणेकर, भरत पेदे तसेच डबेवाले आणि कोळी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.