लाक्षणिक सत्याग्रह करण्याचे जाहीर करून प्रत्यक्षात काम बंद ठेवणार्या मनपाच्या कर्मचारी व कामगारांना मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी जोरदार दणका दिला आहे. अचानक केलेल्या संपात सहभागी झालेल्यांवर बिनपगारी रजेची कारवाई करण्याचा निर्णय डॉ. जावळेंनी घेतला आहे. त्यामुळे आज मंगळवारी अचानक संपावर जाऊन मनपाचे दैनंदिन कामकाज बंद ठेवणार्या कर्मचारी व कामगारांचे धाबे दणाणले आहे.
मनपा कामगार संघटनेने 5 सप्टेंबरला मनपासमोर एकदिवशीय लाक्षणिक सत्याग्रहाची पूर्वसूचना मनपा प्रशासनाला दिली होती. त्यानुसार मंगळवारी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर काहीकाळ सत्याग्रह होणे अपेक्षित होते. मात्र, अचानक कामगार संघटनेने सत्याग्रहाऐवजी संप केल्याने मुख्यालयातील कर्मचारी व कामगारांनी त्यात सहभागी होऊन काम बंद ठेवले. यामुळे विविध कामानिमित्त मनपात आलेल्या नगरकरांचे हाल झाले. विविध विभागात वरिष्ठ अधिकारी असले तरी कार्यालयात कोणीही नव्हते.
परिणामी, नागरिकांची कामे होऊ शकली नाही. त्यामुळे या प्रकाराची मनपा आयुक्त डॉ. जावळे यांनी गंभीर दखल घेतली व अचानक संपावर गेलेल्यांची बिनपगारी करण्याचे आदेश प्रशासन अधिकार्यास दिले आहेत. त्यांच्याद्वारे आता संपात सहभागी झालेल्या कर्मचारी-कामगारांची माहिती संकलित केली जात आहे. कोणी सकाळी मनपाच्या विविध कार्यालयांत हजेरी लावली व नंतर कोण-कोण गायब झाले, याची माहिती घेतली जात असून, त्या सर्वांची बिनपगारी रजा नोंदवण्याची कारवाई केली जाणार आहे.
मनपा कामगार-कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात तसेच लाड-बर्वे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नोकरीचे लाभ मिळण्यासाठी कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी मनपा कामगार संघटनेने लाक्षणिक सत्याग्रहाची नोटीस मनपाला दिली होती. पण ऐनवेळी संप केल्याने मनपाचे कामकाज ठप्प झाले. त्यामुळे आयुक्त डॉ. जावळे यांनी संपकर्यांवर केलेल्या कारवाईचे नगरकरांतून स्वागत होत आ







कृपया बिनपगारी करूवू नका एक दिवस किरकोळ रजा कपात करावी
Comments are closed.