अहमदनगर- अहमदनगर शहराजवळील बुर्हाणनगर गावात एका 22 वर्षिय तरुणीच्या घरात घुसून तिची छेड काढत तिच्या आई-वडीलांना शिवीगाळ करत मारहाण करणार्या 7 जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत तरुणीने फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी (दि.5) सायंकाळी आरोपी वैभव किरण भोसले हा घरी आला व त्याने आपली बहिण घरात एकटी असताना तिला लग्नाची मागणी घातली. त्यास तिने नकार दिल्याने त्याने तिच्या बरोबर गैरवर्तन केले. त्यावेळी आई-वडील मध्ये सोडवायला आले असता त्याने शिवीगाळ करत दोघांना धक्काबुक्की केली. तसेच फोन करुन त्याच्या 6 साथीदारांना बोलावून घेतले. या 6 जणांनी घराजवळील पडलेल्या लाकडी दांडक्याने फिर्यादीची आई, वडील यांना मारहाण केली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी वैभव किरण भोसले, तपेश किरण भोसले, मुंड्या किरण भोसले, वैभव भोसलेचा भाऊ (सर्व रा.धानोरा, ता.आष्टी), टम्मण किफायत काळे, ताज्या पाच्या भोसले (रा.केकती, ता.नगर), बिलकेश महेंद्र काळे (रा.बुर्हाणनगर) या 7 जणांविरुद्ध भा.दं.वि.क. 326, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.