वारुळाचा मारुती रोडवरील ख्रिश्चन दफनभूमीस नालेगाव ग्रामस्थांचा विरोध

0
504

दफनभूमीचा भूखंड विखंडित न केल्यास ग्रामस्थ करणार कुटुंबियांसह उपोषण

मनपा आयुक्तांना नालेगाव ग्रामस्थांचे निवेदन

नगर- अहमदनगर महानगरपालिकेने खिश्चन व गोसावी समाज यांना सन २०१० मध्ये ठराव करुन जागा देण्याबाबत सुचविले होते. त्यावेळी आम्ही सर्व नागरिकांनी व आमच्या प्रभागातील सर्व लोक प्रतिनिधीनी याला विरोध केला होता. त्या विरोधाबाबतचे त्यावेळचे कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यासंदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये यामध्ये देखील बातम्या छापल्या होत्या. त्या अनुशंगाने आम्हा सर्व गावक-यांना व नागरिकांना त्यावेळेस त्याठिकाणी अशी कुठल्याच प्रकारची जागा देण्यात येणार नाही असे तोंडी आश्वासन दिले होते. त्या अनुशंगाने आम्हाला मागील १५ दिवसांपर्यंत त्या जागे संदर्भात कुठलीही माहिती नव्हती. आज दि.२५ ऑगस्ट रोजी आम्हा सर्व गावक-यांना संबंधित भूखंड शेजारील शेतक-यांनी दफन भूमीचे काम सुरु केले असे कळविले. ही माहिती मिळताच आम्ही सर्व गावकरी सव्र्व्हे नं. २२१/१ या ठिकाणी जमा होऊन या संदर्भामध्ये चौकशी केली असता दफन भूमीचे काम सुरु आहे असे आम्हाला सांगण्यात आले या संदर्भामध्ये आम्ही सर्व परवानगी घेतलेले आहेत. या अनुशंगाने आम्ही सर्व गावकरी त्यांना वारंवार विनंती करुन सांगत होतो की, याठिकाणी अशी कुठल्याही प्रकारची जागा देण्यात आलेली नाही असे आम्हाला समजते तरी तुम्ही आम्हाला काही कालावधी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यास द्यावा परंतु त्या ठिकाणी असलेले खिश्चन समाज बांधव व दशनाम गोसावी समाज बांधव यांनी आम्हाला आम्ही काम थांबणार नाही व तुम्ही आमच्या कामामध्ये अडथळा आणला म्हणून आम्ही तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही करु असे सांगितले. या सर्व झालेल्या प्रकाराबाबत व आम्हा गावक-यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही आपणांकडे यासंदर्भामध्ये काही सांगू इच्छितो की, आमच्या भागामध्ये आधीपासूनच रावळ, भराडी, गोसावी यांची दफन भूमी आहे व सरकारी बेवारस प्रेते पुरणे याची देखील व्यवस्था याच भागात करण्यात आलेली आहे. आमच्या भागामध्ये दोन दफन भूमी असताना त्यांचा नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे. बेवारस प्रेत हे कुत्रे उकरुन रस्त्यावर आणतात. या भागात एक नवीन उपनगर तयार होत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन आम्हा गावक-यांच्या वतीने आपणांस विनंती करण्यात येते की, आपण वरील समाज बांधवांना शहरामधील ते राहत असलेल्या परिसरात अरक्षित केलेली जागा द्यावी अशा मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी नालेगाव ग्रामस्थांनी दिली आहे सदर निवेदनाची दखल न घेतल्यास कुटुंबासमवेत नालेगाव ग्रामस्थ मनपा मध्ये उपोषण करू असा इशारा देण्यात आला.

यावेळी मा. विरोधी पक्षनेता संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक शामआप्पा नळकांडे, नगरसेवक अजय चितळे, नगरसेवक सचिन शिंदे, वैभव वाघ, विकी वाघ, राम वाघ, शरद ठाणगे, संतोष लांडे, संदीप दातरंगे, बबन रोहकले, विजय वाडेकर, मधुकर टोणे, सतीष रोहकले, अंबादास जगताप, अशोक मुजळे, संभाजी वाघ, सुभाष रोहोकले, संतोष उगले, रामकिसन राजळे, नंदू रोहकले, शिवाजी वाघ, राज वामन, सनी कराळे, मनेष रोहकले, ऋषिकेश रोहकले, सुरज रोहकले, चंद्रकांत रोहकले, धर्म कदम, प्रदीप जोशी, विशाल वाघ आदी उपस्थित होते.