संतोष देशमुख यांना निर्दयीपणे केलेल्या मारहाणीचे अंगावर काटे आणणाऱ्या फोटो आणि व्हिडिओजनंतर अखेर मंगळवारी (4 मार्च ) धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला .धनंजय मुंडेंना क्लीन चिट देणाऱ्या नामदेव शास्त्रींची मानसिकता राजीनाम्यानंतर बदलली आहे .या कुठल्याही प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग नसल्याचे सांगणाऱ्या भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या मागचा वरदहस्त काढून घेतलाय . संतोष देशमुख हत्याप्रकरणी पहिल्या दिवशी मला पूर्वकल्पना नव्हती .धनंजय देशमुख यांच्याशी भेट घेतल्यानंतर माझे भावना बदलली .भगवानगड देशमुख कुटुंबाच्या मागे आहे .असं आता नामदेव शास्त्री म्हणाले आहेत .
संतोष देशमुख प्रकरणात मकोका अंतर्गत कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडचे धनंजय मुंडेंची आर्थिक संबंध असल्याचे आरोप होत असताना नामदेव शास्त्रींनी भगवानगड धनंजय मुंडे यांचा पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितलं होतं .धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत असेही ते म्हणाले होते .धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे मी शंभर टक्के सांगू शकतो असं म्हणत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं सांगितलं होतं .संतोष देशमुख हत्याप्रकरणी पहिल्या दिवशी जेंव्हा मी पहिलं वक्तव्य दिलं तेव्हा मला पूर्वकल्पना नव्हती .दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे .भगवानगडाला मानणारा आहे .त्यांनी मला या प्रकरणाची जाण करून दिली .त्यामुळे माझी भावना बदलली .भगवानगड कुटुंबाच्या पाठीशी आहेत . लोकांनी गैरसमज करू नये .मला जाण झालेली आहे . न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टातून न्याय मिळवून द्यावा .
31 जानेवारी 2025ला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवला होता. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर आमच्या समाजाचं मोठं नुकसान झालं आहे. असंही ते म्हणाले होते. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. धनंजय देशमुख यांनी 2 फेब्रुवारी 2025 रोजी भगवानगडावर पुराव्यांच्या फाईलसकट धडक मारली. धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाब असताना धनंजय मुंडे यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत, त्यांची खरी मानसिकता तपासण्याची गरज असल्याचे धनंजय देशमुख नामदेव शास्त्री यांना म्हणाले होते. त्यानंतर मंगळवारी 4 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. राजिनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी माझी भावना बदलल्याचे सांगत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं सांगत धनंजय मुंडेंमागचा वरदहस्त काढून घेतल्याचे दिसले.






