महाराष्ट्र हादरला…बड्या बांधकाम व्यावसायिकाची घरासमोरच गोळ्या घालून हत्या!

0
1128

नांदेड : नांदेडमध्ये (nanded) बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार (firing) केला. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या दोघांवर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान बियाणी यांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी ११ वाजेची ही घटना घडली आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या संजय बियाणी आणि यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या चालकाची प्रकृतीही चिंताजनक आहे. गोळीबाराच्या या घटनेने शहरात तणावाचे वातावरण आहे. संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे प्रस्थ होते. खंडणी वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.