Monday, May 20, 2024

महाराष्ट्रात राजकीय भूकंप…शिवसेनेचे 14 खासदार भाजपच्या संपर्कात…बड्या नेत्याचा दावा

shivsena mp..
मुंबई: शिवसेनेचे १४ खासदार हे आमच्या संपर्कात असल्याचे, असा दावा भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला आहे. शिवसेनेचे हे खासदार पक्षावर असंतुष्ट आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या १४ खासदारांची तळमळ शांत करता आलेली नाही. मात्र, या असंतुष्ट खासदारांची जळजळ शांत करण्याचं चूर्ण भाजपकडे आहेत, असे सूचक वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रसाद लाड यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रसाद लाड यांनी तुर्तास शिवसेनेच्या या १४ नाराज खासदारांची नावे उघड करण्यास नकार दिला आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ही नावं जाहीर करू, असे प्रसाद लाड यांनी म्हटले. याशिवाय, राज्यातील शिवसेनेचे २४ ते २५ आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचे लाड यांनी म्हटले आहे. सध्या लोकसभेत शिवसेनेचे १८ खासदार आहेत. यापैकी १४ आमदार भाजपच्या संपर्कात असल्यास ही शिवसेनेसाठी गंभीर समस्या ठरू शकते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles