केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महत्त्वाची भूमिका मांडली. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावे, अशीही मागणी आहे. माझा कोणत्याही बाबतीत विरोध नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे, सरसकट करु नका, हा निर्णय घेताना राज्य सरकारने घटनेतील कलम 15 (4), 16 (4) याचा अभ्यास करावा. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेल्या मराठा समाजाच्या नागरिकांना आरक्षण द्यावं”, अशी भूमिका नारायण राणे यांनी मांडली.
“सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही. त्यामुळे सरसकट विचार करण्यापेक्षा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेले याचा सर्व्हे व्हावा. महाराष्ट्रात जवळपास 38 टक्के मराठा समाज आहे. जे गरीब आहेत, ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक पात्रता मिळवता आली नाही, अशा समाजातील वर्गाला आरक्षण देण्यात यावं”, असं मत नारायण राणे यांनी मांडलं.






