शरद पवार कृषीमंत्री होणार की नाही हे मी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेच सांगू शकतील, असे महत्त्वपू्र्ण विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी केले. त्यांच्या या विधानामुळे शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.
गत काही दिवसांपासून राज्यात शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी यासंदर्भात एक सूचक विधान केल्यामुळे या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्याचे झाले असे की, पत्रकारांनी नारायण राणे यांना शरद पवार केंद्रात कृषीमंत्री होणार का? असा थेट प्रश्न विचारला. त्यावर राणे एक क्षण थांबले अन् म्हणाले, हा माझा विषय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेच यावर बोलतील.
नारायण राणे यांनी यावेळी शरद पवार भाजपसोबत येण्याचा मुद्दा स्पष्टपणे फेटाळला नाही. उलट यावर मोदी – शहा हेच बोलतील, असे विधान केले. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा पवार व भाजपत काही बोलणी सुरू आहे काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.






