धाराशीवनंतर नाशिकमध्येही शिंदे गटाला उमेदवारी नाही, छगन भुजबळांचे तिकिट फायनल…

0
12

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार असा दावा केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना लोकसभेचे तिकीट मिळण्याचे संकेत आहे. यामुळे महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उद्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे उमेदवारी जाहीर करण्यास आत्तापर्यंत उशीर होत असल्याचे समजते. मात्र आता अधिकचा वेळ न दवडता उद्याच राष्ट्रवादी आपला उमेदवार जाहीर करून टाकणार अशी माहिती मिळत आहे.