मोठा ट्वीस्ट..नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत,सुधीर तांबेची माघार

0
27

विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघातून काँग्रेसने मोठी खेळी खेळली. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने सत्यजीत तांबे हे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असणार आहेत.