नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भाजपाच्या भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची नाशिकमध्ये सभा पार पडत आहे. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शिवसेना ठाकरे गटावर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटावर टीका केली. “नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल. नकली शिवसेना जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होईल, तेव्हा मला सर्वात आधी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येईल”, अशी टीका मोदींनी केली.






