मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे जाहीर करीत शिवसेनेला आव्हान देणारे खा.नवनीत राणा व आ.रवी राणा दाम्पत्य देशभरात चर्चेत आले. हनुमान चालिसावरुन शिवसेनेच्या हिंदुत्त्वावर राणा दाम्पत्याने निशाणा साधला. त्यामुळे देशात हे दाम्पत्य चर्चेत आले. मात्र हनुमानासंदर्भातील एका प्रश्नावर राणा दाम्पत्याची एका टिव्ही चॅनेलवरील मुलाखतीत बोलती बंद झाल्याचे पहायला मिळाले. कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. तो त्यांनी शिवसेनेच्या प्रा.शिल्पा बोडखे यांच्या टिव्टर अकाउंटवरुन शेअर केला आहे. हनुमानजी यांचे नाव सुरुवातीला हनुमान नव्हते, ते नाव कशावरुन पडले असा प्रश्न राणा यांना विचारण्यात आला. त्यावर रवी राणा यांनी चुप्पी साधली तर नवनीत राणा यांनी हसून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.
😂😂😂😂😂😂 https://t.co/9z62SeuOwu
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 16, 2022