नवाब मलिक यांचे दाऊद गँगशी संबंध, कोर्टाचे निरीक्षण, सोमय्यांचा उध्दव ठाकरेंवरही गंभीर आरोप

0
616

राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे दाऊद गँगशी संबंध असल्याचं प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे स्पष्ट होत असल्याचं विशेष कोर्टानं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच कोर्टानं केलेल्या टिपण्णीनंतर किरीट सोमय्या यांनी मलिकांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी ठाकरेंची भागीदारी असल्याचा हल्लाबोल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

नवाब मलिक यांचे दाऊद गँगशी संबंध असल्याचं प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे दिसतं अशी टिपण्णी कोर्टानं केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मलिक यांचे दाऊद गँगशी संबंध उघड झाले आहेतच. पण त्यांना मंत्रिमंडळात ठेवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही दाऊद गँगशी संबंध निर्माण झाले आहेत का? असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी मागणीही सोमय्यांनी केली आहे.