अंजली दमानिया यांच्या ट्वीटनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, बुधवारी अजित पवारांनाही याबाबत उत्तर देणं टाळलं आहे. “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा लहान कार्यकर्ता काय बोलणार?” असं विधान करत अजित पवारांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. त्यामुळे अजित पवार भाजपाबरोबर जाणार की नाही? याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे
या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर सत्ता स्थापन करणार का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, “मला माहीत नाही.” शरद पवारांनीही थेट प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संभाव्य सत्तांतराबद्दल संशय आणखी गडद होताना दिसत आहे.






