Saturday, May 25, 2024

त्यांचा तोल पूर्णपणे ढळला आहे…शरद पवारांची अजित पवारांवर बोचरी टीका…

बोल भिडू’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही काळात करत असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली.

कुटुंबात तर असं बोलणं अतिशय अयोग्य आहे. पण ज्याचा तोल ढळतो, तो काहीही बोलतो. मग त्यांना दाऊदचीही आठवण होते आणि भूखंडाच्या श्रीखंडाचीही आठवण होते. याचा अर्थ त्यांचा तोल हा पूर्णपणे ढळलेला आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“तुम्ही कचाकच बटणं दाबा, मी विकासनिधी देतो”, अशा आशयाचं विधान अजित पवार यांनी केल्यानंतर त्यावरून बराच वाद निर्माण झाला. त्यावरही शरद पवारांनी टीका केली. “एक समज असा आहे की मला निवडून दिलं किंवा माझ्या विचारांचा माणूस निवडून दिला तर मी जास्त निधी आणेन. केंद्र सरकारचा निधी असा खासदारांना देत नसतात. तो त्याच्या मतदारसंघाच्या विकासासाठी दिला जातो. तेवढी एकच सुविधा खासदारांसाठी असते. संसदेच्या सभागृहात लोकांचे प्रश्न मांडणे, प्रश्न सोडवून घेणे आणि त्यासाठी आपलं प्रतिनिधित्व प्रभावी करणे याची काळजी प्रतिनिधींनी घ्यायची असते”, अशा शब्दांत शरद पवारांनी अजित पवा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles