निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला नोटीस पाठवली होती. त्या नोटीसला आता शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आलं आहे. या उत्तरात शरद पवार यांच्या गटाकडून अजित पवार यांच्या गटाला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या उत्तरात नमूद केले आहे की,
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही.
अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाबाबत केलेली मागणी तथ्यहीन आणि दुर्भाग्यपूर्ण आहे.
निवडणूक आयोगाने अजित पवारांची मागणी फेटाळली पाहिजे.
अजित पवारांच्या याचिकेमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत हे सिद्ध होत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणूक आयोगात नोंदणीकृत पक्ष आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि अध्यक्षपदाचं पत्र स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे.