Monday, May 20, 2024

अजितदादा, सुप्रियाताई सरसावल्या…राष्ट्रवादीत मोठे इनकमिंग!

ncp..इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द या गावचे सरपंच बापुराव लिंबाजी शेंडे आणि इंदापूर पंचायत समितीच्या माजी सभापती स्वातीताई शेंडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्यमंत्री दत्तामामा भरणे खा.सुप्रिया सुळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे, मा.जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, वैशालीताई पाटील, अभिजित तांबिले, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ,युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, अतुल झगडे, सचिन खामगळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles